मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढच होत आहे. देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र, यानंतर ईडीनं थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत अनिल देशमुखांची यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्यानं त्यांना काल कोर्टात हजर केलं असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांना ईडी कोठडी द्यावी, अशी अंमलबजावणी संचलनालयाची मागणी होती. ईडीनं आता सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतल्यानंतर अनिल देशमुख यांना पुन्हा १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
ऋषिकेश देशमुख यांना दिलासा नाही
दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी (५ नोव्हेंबरला) हजर होण्याचं समन्स दिलं होतं. मात्र, त्यांनी ईडीसमोर हजर होण्याऐवजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, ऋषिकेश देशमुख यांचा अटकपर्व जामीन फेटाळण्यात आलाय.