नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत जळगावमधून स्मिता वाघ आणि रावेरमधून रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कुणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर?
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
जळगाव आणि रावेरमध्ये नेमकं काय घडलं ?
रावेरमध्ये रक्षाताई खडसे यांची उमेदवारी कापली जाईल अशी एक चर्चा होती. परंतू रक्षाताई खडसे यांना पर्याय कोण?, याचे उत्तर शेवटपर्यंत भाजपला मिळू शकले नाही. तसेच गिरीश महाजन हे देखील फारसे निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हते. त्यामुळे सहज निघणारी जागा का म्हणून फसवायची?, असा एक सूर समोर आला. तशात रक्षाताई सुरुवाती पासून डगमगल्या नाहीत. प्रचारात त्यांनी आपली सकारात्मक भूमिका कायम ठेवली. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली.
दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार यांच्या बद्दल मतदार संघातच नव्हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. तसेच त्यांना पर्याय असणारे उमेदवार देखील आपापले प्रयत्न करत होते. परंतू धरणगावातून अॅड. संजय महाजन यांच्या लेटर पॅडवर पदाधिकाऱ्यांनी काढलेले पत्रक डी. आर. पाटील यांना अडचणीचे ठरले तर रोहित निकम यांचा वर्षभरापूर्वी झालेला भाजप प्रवेश ही त्यांची कमकुवत बाजू ठरली. दुसरीकडे स्मिताताई यांचा संघाशी असलेला थेट संपर्क हे त्यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.