औरंगाबाद (वृत्तसंस्था) कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. कोळसा टंचाईवरून मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर, कोळसा घोटाळेबाजाकडूनच भाजपने मोठ्या देणग्या घेतल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी एमजीएम पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांनी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
राऊत म्हणाले ‘UPA सरकारकारच्या काळात कोळसा घोटाळ्यावर भाजपने संसद बंद पाडली होती. संसदेचं कामकाज करून दिलं नव्हत. मात्र सत्तेत आल्यावर यांनीच कोळसा घोटाळा करणाऱ्याकडून मोठ्या देणग्या घेतल्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच आजच्या आक्रोश मोर्चामध्ये संजय राऊतांनी आपल्या भाषणात भाजपवरती हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, त्रिपुरात काही झालं आणि दंगे सुरू झाले. महागाईवरुन जनतेने लक्ष हटवण्यासाठी हे सुरू केलं असाही आरोप त्यानी यावेळी केला. देशात महागाईचा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र यावरती प्रश्न विचारला की, हिंदू-मुसलमान, पाकिस्तान-भारत-चीन असलेच विषय काढून जनतेची दीशाभूल केली जात असल्याचही ते म्हणाले.
तसेच महाराष्ट्रात आग लावून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. माभ आजचा हा औरंगाबादचा मोर्चा त्यांना इशारा आहे, आम्हाला हात लावला तर हात पेटवल्या शिवाय राहणार नाही. कितीही कारस्थान केली तरी महाराष्ट्रात शिवसेना तुमच्या छताड्यावरती पाय देऊन पुढं जाणारच असं राऊत म्हणाले.