जळगाव (प्रतिनिधी) भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांच्या वाहनाला बुधवारी पहाटे अपघात झाला. या अपघातात जळकेकर महाराज त्यांचे चालक हे किरकोळ जखमी झाली आहेत.
ज्ञानेश्वर जळकेकर हे मंगळवारी नगर जिल्ह्यातील एका ठिकाणी कीर्तनाच्या कार्यक्रमाला गेले होते. कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून रात्री आपल्या गावाकडे परत येत असताना, पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास चालक आनंदा नेवे यांना डुलकी लागल्याने वाहनाचा ताबा सुटला, नियंत्रण सुटलेले वाहन रस्त्याच्या पलीकडे धडकले. सुदैवाने वाहन धडकल्यानंतर कारमधील सर्व एअर बॅग उघडल्या. त्यामुळे दोघांनाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नाही. मात्र, या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. तर ड्रायव्हर आनंदा नेवे यांना मुका मार लागला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.