मुंबई (वृत्तसंस्था) ‘राजकारण व अध्यात्म हे परस्परविरोधी मार्ग आहेत. भाजपच्या अधर्माचा अध्यात्माशी संबंध काय? भाजपची अध्यात्मिक आघाडी या तोंडातून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. भोंगळवाद स्थापित करण्याचं काम भाजप करत आहे,’ असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
अनलॉकमध्ये सर्व गोष्टींना परवानगी दिली असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. अनलॉकमध्ये मंदिरांचा समावेश करावा. यंदा पायी वारी झालीच पाहिजे, आम्ही तडजोड स्वीकारणार नाही,’ असा इशारा भाजपचे तुषार भोसले यांनी दिला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर तोफ डागली आहे.
‘राजकारण व अध्यात्म हे परस्परविरोधी मार्ग आहेत. भाजपच्या अधर्माचा अध्यात्माशी संबंध काय? भाजपची अध्यात्मिक आघाडी या तोंडातून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. भोंगळवाद स्थापित करण्याचं काम भाजप करत आहे,’ असा आरोप सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. सावंत यांनी भोसले यांना ‘अनाचार्य’ असं संबोधलं आहे. ‘अनाचार्याच्या भाषेचा अध्यात्माशी दूरचाही संबंध नाही. धर्माच्या राजकारणासाठीचे हे थोतांड बंद करा,’ असं सावंत यांनी सुनावलं आहे.