सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ते एका पोलीस अधिकाऱ्याला बाळाचा वापर करून अटक करण्याची सूचना देत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत आहे.
अनिल परब हे रत्नागिरीतील पत्रकार परिषदेदरम्यान पोलिसांच्या संपर्कात होते. त्याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला होता. नारायण राणे यांना ताब्यात घ्या, पोलीस फोर्स वापरा असं अनिल परब म्हणाले होते. त्यामुळे आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नारायण राणे यांना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे.
चंद्रकांत पाटलांचा इशारा
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब हे थेट पोलिसांशी संवाद साधत असल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. परब यांच्याविरोधात थेट कोर्टात जाणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
“मुख्यमंत्रीच गुंडांचा सत्कार करत असतील तर, आता यावर राष्ट्रपती राजवट हाच उपाय”
भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, ”तर कालची घटना म्हणजे पश्चिम बंगालप्रमाणे राज्य सरकार पुरस्कृत हिंसाचार होती. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांवर सुरक्षेची जबाबदारी असते. मात्र इथे मुख्यमंत्रीच गुंडांचा सत्कार करत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे. आता अशा ठकांपासून सुरक्षिततेसाठी एकच उपाय आहे तो म्हणजे राष्ट्रपती राजवट”, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
















