भंडारा (वृत्तसंस्था) भाजपच्या (BJP) हातून सत्ता गेल्यानंतर भाजपची काळी नजर महाविकास आघाडी सरकारवर आहे. मात्र भाजपची काळी जादू चालणार नाही, ही सरकार ५ वर्ष चालणार असल्याच्या विश्वास कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला.
‘सरकार राष्ट्रावादी चालवत असून काँग्रेस -शिवसेना बघाची भूमिका घेत असल्याच्या आरोप केला जात आहे, पण मुळात भाजपची पहाटे आलेले सरकार गेल्याने भाजपची तडफडत होत आहे’ अशी टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली. तसंच, आम्ही सत्तेत भागीदारी असून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार काम करत आहे. ह्याच्या त्रास विरोधकास होत असून त्यांची काळी नजर आहे. त्यामुळे भाजप ची काळी जादू चालणार नसून ही सत्ता 5 वर्ष चालेल, असंही नाना पटोले यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं.
प्रवीण दरेकरांवर कारवाई व्हावी
दरम्यान, बँकेचे नियम धाब्यावर बसुन मुंबई बैंकेत हजारों कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई व्हावी. बैंक घोटाळा प्रकरणात प्रवीण दरेकरांच्या मुंबई सेशन कोर्टमध्ये जामीन फेटाळला नंतर दरेकर जामिनासाठी उच्च न्यायालयात गेले असून आज त्यावर सुनावणी होणार आहे. पण, मुंबई बैंकेत घोटाळा झाला असून लेखा परीक्षणामध्ये तसा अहवाल आला आहे. त्यांचे मुंख्य सूत्रधार प्रवीण दरेकर आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.