धुळे (प्रतिनिधी) काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. लखीमपूर दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी धुळे शहरालगत असलेल्या मुंबई- आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली या ठिकाणी आंदोलकांतर्फे रास्ता रोको करण्यात आला आहे.
लखीमपूर दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत हा रस्ता रोको करण्यात आला आहे. रास्ता रोको दरम्यान मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याचे बघावयास मिळाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा रास्ता रोको दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघायला मिळाले. यावेळी रास्ता रोको दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.