बोदवड (प्रतिनिधी) येथील तहसीलदार कार्यालयात शुक्रवारी सकाळी पाणी टंचाईवर आढावा बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरेल. तसेच पाणी प्रश्नी २७ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार अनिल वाणी, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे,ओडीए प्रादेशिक अभियंता विशाल तायडे, नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन तायडे बैठकीला हजर होते.
आमदार एकनाथराव खडसे यांनी व माजी गटनेते कैलास चौधरी यांनी पाणी पुरवठा संबधात मुख्याधिकारी तायडे यांना धारेवर धरत आमच्या सत्तेच्या काळात शहरात पाणी पुरवठा हा पाच ते सात दिवसाआड देण्यात येत होता. तालुक्यातही पाणी पुरवठा व्यवस्थित होता. आताच्या परिस्थितीत शहराला २१ दिवसाआड पाणी पुरवठा कसा काय होत आहे?, आपले नियोजन नाही का?, गरज भासल्यास शासन स्तरावर प्रस्ताव तयार करून टँकर व्यवस्था का करण्यात आली नाही?, असे अनेक प्रश्न आमदार खडसे यांनी यांना विचारले. यानंतर खडसे यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करत तालुक्यातील काही अधिकारी कामचुकारपणा करत असून त्यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी केली.
यावेळी तालुक्यातील ४४ गावांमध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत जी कामे आहेत, हा पैशाचा चुराडा असून तालुक्यात आमच्या तिसरा वर्षाच्या काळात भरपूर विहीरी बोअरवेल केले. पण पाणी लागले नाही आणि जलजिवन योजनेतून काय पाणी लागणार असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना केला. जामठी येथे जलजिवन मिशन अंतर्गत ७० फुट विहीर झाली पाणी लागलेले नाही, त्याच प्रमाणे तालुक्यातील साळशिगी मुक्तळ येथे काय परिस्थिती आहे. या तालुक्यात पाणी नसून या योजनेच्या जलवाहिनी पण टाकल्या जात आहे ,याचे काय निकष असतील ते दाखवले गेले पाहीजे व त्याच प्रमाणे कामे झाली पाहीजे, असेही खडसे यांनी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी इंगळे यांनी पाच गावानेमध्ये विहीर अधिग्रहण व टँकर व्यवस्था करण्यात आली आहे. वरखेडा खुद्र ,वरखेड बुद्रुक, मनुर बुद्रुक आणि मनुरखुर्द येथे विहीर अधिग्रहण तर एणगाव येथे टँकर व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, रामदास पाटील, गटनेता जफर शेख, नगरसेवक भरत पाटील, हकीम बागवान, गोपाल गंगतिरे, महीला तालुका अध्यक्ष वंदना पाटील, प्रतिभा खोसे, कविता गायकवाड त्यांच्यासह बोदवड तालुक्यातील शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.