बोदवड (प्रतिनिधी) येथील अखिल भारतीय कुणबी महासंघाचा जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात संस्थापक अध्यक्ष शिवा पाटील गोंड यांनी महासंघाच्या स्थापना २००९ झाल्या पासून उपवर युवक-युवती परिचय मेळावे व व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून एक हजारावर विवाह जुळवले गेले, हे सांगत सुरू असलेल्या इतरही कामांचा कामाचा लेखा जोखा आणि पुढील वाटचाली संबधी धोरण मांडले.
कार्यक्रमासाठी उपस्थित अकोला येथील पत्रकार व लेखक चंद्रकांत झटाले यांनी कार्यकर्त्यांना सामाजिक क्षेत्रात कामसबंधी मार्गदर्शन केले आणि महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती चे औचित्य साधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलूचा परिचय उपस्थितांना करून दिला.मेळाव्याचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आला.
यावेळी बुलडाणा ,जळगाव जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती घोषित करण्यात आली. जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख जगन्नाथ शेळके, सोशल मीडिया अध्यक्ष अमोल ढेकळे पाटील, यांची तर बोदवड तालुका कार्यकारिणी अध्यक्ष समाधान बोरसे, उपाध्यक्ष गजानन बिल्लोरे, तालुका संपर्क प्रमुख देविदास शेळके, सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण पाटील, बोदवड शहर अध्यक्ष रवींद्र मराठे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. तर मुक्ताईनगर भुसावळ सिद्धेश्वर वाईके, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष ब्रिजलाल मराठे. यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्या.
बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अमोल टप, मलकापूर तालुकाध्यक्ष सचिन कापसे, शहराध्यक्ष गणेश रोठे, उपाध्यक्ष वीरेंद्र कासे, तालुका उपाध्यक्ष माताडे, मोताळा तालुकाध्यक्ष गणेश बोराडे यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले.यावेळी प्रदेश सचिव प्रवीण कान्हे, संतोष खंडेराय, दीपक टिकार, गोपाल गोलाईत,प्रमुख पाहुणे म्हणून बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, कडू बोरसे ,समाधान जगताप ,सुनील बोरसे मंगल कान्हे, सुरेश कान्हे,संतोष पाडर ,संतोष कान्हे , शैलेश वराडे, सागर पाटील ,गजानन गिरडे ,गंगाराम शेळके ,प्रल्हाद काळे ,राजू सोनवणे , चेतन तांगडे ,अमोल देशमुख, गजानन बोरसे ,विजय कान्हे,अक्षय बोरसे ,वैभव काळे, स्वप्निल कान्हे उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कडू बोरसे हे होते प्रस्तावना प्रवीण कान्हे यांनी मांडली सूत्रसंचालन अनंता वाघ यांनी केले तर आभार मंगल कान्हे यांनी मानले. मेळाव्यास जळगाव , बुलडाणा, मलकापूर, मोताळा, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.सर्व समाज बांधव उपस्थित होते.













