जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या घरावर आज रात्री गोळीबार झाला आहे. हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे जळगावात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या गोळीबार झाला आहे. यात ते सुदैवाने बचावले असून ते आता तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. कुलभूषण पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड वेगाने पुढे आले आहेत. जळगाव महापालिकेतील सत्तांतरात त्यांचा मोठा वाटा होता. याचमुळे त्यांना उपमहापौर पद मिळाले. याच पार्शवभूमीवर आज थेट त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.