साकळी ता.यावल (प्रतिनिधी) आपले राज्य हे मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले देशातील एकमेव असे राज्य आहे. या गड-किल्ल्यांची अनुभूती यावी, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण व्हावे आणि आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा त्याचप्रमाणे मुलांनाही मातीशी खेळण्याचा आनंद मिळावा या उद्देशातून जय दुर्गा मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी नव्याने तसेच कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊनच …चला आपल्या घरीच कुटुंबासंगे ‘गड-किल्ला ‘बनवूया! या संकल्पनेवर आधारित ‘सुंदर गड-किल्ले बनवा स्पर्धा-२०२०’ ही अभिनव स्पर्धा साकळी येथील बाजारपेठ भागातील जय दुर्गा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे.
राज्याच्या कान्या-कोपर्यात गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे.ज्या काळी, ज्या प्रतिकूल भौगोलिक अवस्थेत हे गड-किल्ले बांधले त्यावेळची असलेली तंत्रज्ञानाची उपलब्धता लक्षात घेता, हे गड-किल्ले “चमत्कारा”पेक्षा काही वेगळे नाहीत. त्यामुळे आज हे गड-किल्ले आपला ऐतिहासिक वारसा बनले आहे. यामुळे ‘सुंदर गड-किल्ले बनवा स्पर्धा-२०२०’ ही अभिनव स्पर्धा साकळी येथील बाजारपेठ भागातील जय दुर्गा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने दिवाळी सणातील किल्ले बनवण्याची आपली जुनी परंपराही कायम राहील. हि स्पर्धा दि.२३ व दि.२४ या दोन दिवसा दरम्यान होणार असून या स्पर्धेकरता प्रथम, द्वितीय, तृतीय, दोन उत्तेजनार्थ, दोन प्रोत्साहनपर असे एकूण सात बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता स्पर्धकांना आपला किल्ला घरीच कुटुंबाच्या संगे करायचा आहे.
गड- किल्ला करतांना आपल्याजवळ उपलब्ध असलेली कोणत्याही प्रकारची माती, विटा, लहान-मोठे दगड,हिरवी अथवा वाळलेली झाडे-झुडपे,कागद- पुठठा,वाळू, यासह इतर आवश्यक साहीत्य रंगवितांना पर्यावरण पूरक रंग यांचा वापर करावा लागणार असून बनवलेल्या किल्ल्यातील बारकावे जसे गुप्तद्वार, गुप्तवाट, मुख्यरस्ता,खंदके, बुरुज, तळमाथा, पाण्याची व्यवस्था, मजबूत तटबंदी, पायथ्याशी असलेले गाव, घनदाट जंगल यासह सर्व बारीकसुरीक बाबींना महत्त्व दिले जाणार आहे. सदर स्पर्धा दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यक्षेत्रातील बाजारपेठ भागासाठी आयोजित करण्यात आले आहे. ही अभिनव व नाविन्यपूर्ण स्पर्धा गावात सदर दुर्गा उत्सव मंडळामार्फत गावात पहिल्यांदाच राबवली जात आहे. विशेष आहे. मंडळाच्या महिला पदाधिकारी सौ. शुभदा नेवे व सौ.रोहिणी नेवे यांच्या तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा राबवली जाणार आहे.