अमळनेर (प्रतिनिधी) 28 नोव्हेंबर हा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा व्हावा व शाळांमध्ये उद्बोधन पर कार्यक्रम, व्याख्यान ,निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा कार्यक्रम करण्यात यावेत, अशा आशयाचे निवेदन अमळनेर येथील पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सौ चव्हाण मॅडमच्या वतीने शिक्षण विस्ताराधिकारी पी.डी धनगर यांना ओबीसी विद्यार्थी पालक शिक्षक असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.
शिक्षक दिन हा चारित्र्य संपन्न व आदर्श शिक्षकांचे गुण असणाऱ्या व्यक्तीच्या नावाने साजरा केला पाहिजे. महात्मा फुलेंचा त्याग आणि बहुजनांच्या कल्याणासाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहे, डॉ राधाकृष्णन यांच्या जन्माच्या 40 वर्षे अगोदर महात्मा फुले यांनी मुलींची शाळा पुण्यात सुरू केली. 19 ऑक्टोबर 1882 रोजी हंटर कमिशन समोर बहुजनांच्या मुलांना बारा वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देण्याची मागणी त्यांनी केली म्हणून महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच शिक्षक दिवस म्हणून साजरा करावा व पुण्यतिथीचे औचित्य साधून शाळांमध्ये विविध उद्बोधन पर कार्यक्रम व्याख्यान ,निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा यांचे आयोजन करावे अशा आशयाचे परिपत्रक गटशिक्षण अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व शाळांवर आदेशित करावे अशी मागणी ओबीसी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, महिला जिल्हाध्यक्ष वसुंधरा दशरथ लांडगे, शहराध्यक्ष डी.ए सोनवणे, सल्लागार दशरथ लांडगे,संघटक आर.आर.सोनवणे, महिला अध्यक्ष भारती चव्हाण, तालुका अध्यक्ष सोपान भवरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर चौधरी ,मनोहर पाटील यांनी केले आहे.