नशिराबाद (सुनील महाजन) येथे खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या दोन शतकांची अखंड परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवास आज प्रारंभ झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात बारागाड्या ओढणे, कठडे मिरवणूक, लोकनाट्य आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
सुनसगाव रस्त्यालगत श्री खंडेराव महाराज यांचे पुरातन मंदिर आहे. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यंदा १६ एप्रिल सोमवारी सकाळी ८ वाजता श्रींच्या मूर्तीस पंचामृत महाभिषेक पूजन करून यात्रोत्सवास प्रारंभ झाला. १६ रोजी सकाळी ८ वाजता पारंपरिक पूजन व दुपारी ४ वाजता सत्यनारायण पूजन करण्यात आले. चैत्र वद्य प्रतिपदेला अर्थात १७रोजी पहाटे श्रींची पूजा सायंकाळी ६ वाजता भगत सुदाम दामू धोबी यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी ७ वाजता कठडे मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता प्रियाबाई रावेरकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. १८ व १९ रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीस महापूजन अभिषेक व रात्री ८ वाजता लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. तरी गावातील सर्व परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी व गावातील लोकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
खंडेराव महाराज यात्रोत्सवासाठी अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्षपदी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष लालचंद्र पाटील यांची निवड झाली. खजिनदार ज्ञानदेव लोखंडे, सचिव मोहन येवले, सेक्रेटरी पंकज महाजन आहेत. सरपंच विकास पाटील प्रकाश बोंडे, किरण पाटील, किशोर पाटील आदींचे सहकार्य आहे. गावातील गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ यात्रोत्सवासाठी परिश्रम घेतले. आतापर्यंत कै. रघू धोबी, कै. शंकर रघू धोबी, कै. गणपत शंकर धोबी, कै दामू शंकर धोबी कै. मोतीलाल संपत धोबी यांनी बारागाड्या ओढलेल्या आहेत. दोनशे वर्षांपासून धोबी घराण्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान चैत्र वद्य प्रतिपदेला खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे.
नशिराबाद येथील धोबी घराण्याकडे सुमारे दोनशे वर्षांपासून बारागाड्या ओढण्याची प्रथा आजही सुरुच आहे. पिढ्यान् पिढ्या बारागाड्या ओढण्याची परंपरा धोबी घराण्याने सांभाळलेली आहे. कै दामू धोबी यांनी ३५ वर्षे बारागाड्या ओढल्या. त्यांच्या आधीही कित्येक पिढ्यानपासून बारागाड्या ओढण्याची प्रथा आहे. गेल्या काही वर्षापूर्वी मोतीलाल संपत धोबी (गोमा धोबी) यांचे निधन झाले. त्यामुळे आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर उर्फ सुदाम धोबी यांनी ही धुरा सांभाळली आहे. यंदा बारागाड्या ओढण्याचे त्यांचे पाचवे वर्ष आहे. होते बारागाड्या व खंडेराव महाराज यात्रोत्सवाला अनन्य महत्त्व आहे दोन वर्षे कोरोना महामारी मुळे उत्सव साध्यापद्धतीने साजरा करण्यात आला होता. या वर्षी निर्बंध मुक्त झाल्यामुळे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात करण्यात आला.