जळगाव (प्रतिनिधी) हवामान खात्याकडून उद्या दि. १८ ऑगस्ट २०२१ रोजी वीज वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जळगाव जिल्हयातील सर्व नागरिकांनी याबाबत दक्षता घेण्याचेही आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खाते IMD कडून दि. १८ ऑगस्ट २०२१ रोजी वीज वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सर्व यंत्रणांच्या नियंत्रण कक्षांना सतर्क राहणेबाबत जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. जळगाव जिल्हयातील सर्व नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी नदी पात्रात जाणे टाळावे, आवश्यकता असेल तेव्हाच घरा बाहेर पडावे, विजेचा कडकडाट होत असतांना झाडांचा आसरा न घेता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. असे आव्हानही करण्यात आले आहे.
आपात्कालीन काळात तालुकास्तरावर तहसील कार्यालय नियंत्रण कक्ष व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्ष ०२५७ -२२१७१९३-२२३१८० व टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा.
















