जळगाव प्रतिनिधी । लहान मुलांसह लपंडाव खेळत असतांना ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने घरात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमाला अटक करण्यात आली आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १२ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता पिडीत मुलगी ही लहान मुलांसोबत लपंडाव खेळत असतांना संशयित आरोपी सिध्दार्थ वानखेडे वय ४० याच्या घरात गेली. त्यावेळी सिध्दार्थ याने पिडीत मुलगी ही घरात आली असतांना त्याने दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर संशयित आरोपी हा पसार झाला. दरम्यान पिडीत मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सिध्दार्थ वानखेडे यांच्या विरोधात बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील फरार झालेल्या संशयित आरोपीला रामानंद नगर पोलीसांनी मुंबईतून अटक केली आहे. पुढील तपास सपोनि रोहिदास गभाले हे करीत आहे.