चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील घुमावल येथिल राहणारे भाजपाचे कट्टर,व सच्चा कार्यकर्ता प्रकाश लक्ष्मण पाटील यांनी आज सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिस सूत्राकडून माहितीवरून कळविण्यात आले.
तालुक्यातील घुमावल येथील येथील माजी सरपंच पंचायतराज व ग्रामविकास संयोजक जळगाव जिल्हा पूर्व भागाचे प्रकाश (पप्पु )
लक्ष्मण पाटील वय 44 यांनी आज सकाळी साडेसात आठ दरम्यान घुमावल पासून आपल्या शेतात झाडाला दोरी बांधून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण चोपडा तालुक्यात वार्ता वाऱ्यासारखी पसरली व सर्वपक्षीय लोकांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन हळहळ व्यक्त करत होते.
सकाळी सहा वाजता घरातून निघाल्यानंतर आपल्या घरापासून जवळपास दीड किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या शेतात प्रकाश गेला असता काही वेळाने त्याच्या मुलगा अविनाश हा शेतात गेला असता शेतात वडील दिसून येत नसल्यामुळे तो घराकडे परतला. घरी आल्यावर काकांना सर्व हकीगत सांगितल्यानंतर काका प्रकाशला बघण्यासाठी गेले असता तर दोन शेत आधीच चप्पल दिसले. त्यावरून काकांनी शोध सुरू केला असता, प्रकाश पाटील यांनी झाडाला गळफास घेऊन घेऊन घेतल्याचे दिसताच भावाने हंबरडा फोडताच गावाकडे धाव घेतली. प्रकाश पाटील यांनी नायलॉन दोरीने गळफास घेतलेला होता. तदनंतर पोलिसांना कळविण्यात आले. याबाबत गावात आश्चर्य व्यक्त होत होता की, प्रकाश पाटील यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले?, याबाबत प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण होत होत्या. दुपारी दुपारी जवळपास एक वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले तेव्हा मात्र डॉक्टर सुरेश पाटील यांनी पाहिले असता मृत घोषित केले. आत्महत्याचे कारण नेमके काय असावे?, याबाबत उपजिल्हा रुग्णालय येथे शंकाकुशंका सुरू होत्या.
याबाबत चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते. प्रकाश पाटील हा 20 तारखेला भाजपाच्या बैठकिला जाण्यासाठी तयारी करत होता असे ही भाजपाचे त्यांचे मित्रानी सांगितले होते. प्रकाश पाटील यांना धर्मपत्नी व दोन मुले , तीन भाऊ आणि चार बहीणि असा मोठा परिवार होता.प्रकाश पाटील यांनी काल दुपारी जय श्रीराम असा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल केला होता, त्यामुळेच सर्वांना ह्या आत्महत्या बद्दल आश्चर्य वाटत होते.