चोपडा (प्रतिनीधी) सन २०२३ – २४ या वर्षासाठी चोपडा रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अनिल शिवाजी बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारिणीत सचिवपदी गौरव जैन, उपाध्यक्षपदी सुनिल महाजन तर कोषाध्यक्ष म्हणून मयुरेश जैन यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासत विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेअंतर्गत युवकांसाठी कार्यरत संस्था ‘रोटरॅक्ट क्लब’ या संस्थेचे नवीन वर्ष जुलै पासून सुरू होत आहे. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत मावळते अध्यक्ष प्रा.दिव्यांक सावंत यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली.
नवनियुक्त पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ चोपडा रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभातच होणार असून विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरूणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली दि.१८ जूलै रोजी शहरातील आनंदराज पॅलेस येथे संपन्न होणार आहे.
समारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून पद्मश्री श्री पोपटराव पवार (माजी सरपंच, आदर्शगाव हिवरेबाजार) यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटे.राजीव शर्मा, डॉ.राहुल मयूर, अनिल लोढा (मालेगाव), डॉ.निर्मल टाटीया उपस्थित राहणार आहेत.