चोपडा,दि.१२ (प्रतिनिधी)तालुक्यातील बिडगाव,मोहरद भागात बीएसएनएल मोबाईल रेंज मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून मोबाईल टॉवर शो पीस होण्याचे मार्गावर आहेत.संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेवर लक्ष न घातल्यास ग्राहक टाटा बाय बाय करण्याची दाट शक्यता आहे.हा संपूर्ण परिसर आदिवासी विभागाने व्यापला असल्याने गरिबांचा फोन स्वस्त आणि मस्त म्हणून बीएसएनएलला प्राधान्य आहे मात्र रेंजच मिळत नसल्याने दैनंदिन संपर्कात प्रचंड अडथळा निर्माण झाला आहे तरी निद्रिस्त अधिकाऱ्यांनी जागे होऊन कंपनीचे नुकसान टाळून जनतेला चांगली सेवा मिळावी अशी जोरदार मागणी होत आहे.
चोपडा तालुक्यातील मोहरद बिडगाव कुंड्यापाणी. वरगव्हाण या भागात BSNL चे टॉवर उभारून जवळ जवळ सहा सात महिने पूर्ण झालेले आहे म्हणुन बऱ्याच नागरिकांनी बीएसएनएलचे सिम कार्ड घेतलेले असून काहीं नागरिकांनी जिओ आणि व्ही आय आणि एअरटेलचे सिम कार्ड पोर्टिंग करून घेतले आहे कारण बीएसएनएल ची सेवा ही स्वस्त आणि मस्त आहे असे अगोदर बोललेले जात होते परंतु गावाच्या गावात कॉल करण्यासाठी रेंज मिळत नसल्याने बरेचसे नागरिक BSNL कडे पाठ फिरवताना दिसत आहेत मोबाईल मध्ये नेट ची रेंज येते परंतु कॉलिंग साठी प्रॉब्लेम येत आहे अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर BSNL टावर हे फक्त शो पिस देखावा म्हणूनच उभे असतील असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.