मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५हजाराच्या कथित घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयात मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला असून, यामध्ये अजित पवारांसह ६९ जणांना क्लीनचिट मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला होता. नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. परंतु, त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बँकेच्या ३४ शाखांमधील कथित घोटाळ्यासंबंधित वर्षभर केलेल्या तपासणीत कोणताही पुरावा किंवा अनियमितता आढळली नसल्याचा दावा या अहवालात केला आहे. पोलिसांनी ईडीलाही क्लोजर कॉपी पाठविली. मात्र, ईडीने न्यायालयात क्लोजर अहवालाला विरोध दर्शविला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.