जळगाव (प्रतिनिधी) आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने ३६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरी बाब म्हणजे ४८ रुग्णांनी कोरोनावर मात करत विजय मिळवला आहे. दरम्यान, आज २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
तालुकानिय आकडेवारी
जळगाव शहर १५,
जळगाव ग्रामीण ००,
भुसावळ ०५,
अमळनेर ०५,
चोपडा ०१,
पाचोरा ०२,
भडगाव ०१,
धरणगाव ०१,
यावल ००,
एरंडोल ००,
जामनेर००,
रावेर ०१,
पारोळा ०१,
चाळीसगाव ०२,
मुक्ताईनगर ००,
बोदवड ०२
इतर जिल्ह्यातील ०० असे एकूण ३६ जणांना लागण झाली आहे.