मुंबई (वृत्तसंस्था) बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी असं लिहीत, वारंवार देशात स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचे परत एकदा अभिनंदन, अशी उपरोधिक टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
बिहारमध्ये शिवसेनेने लढवलेल्या २३ पैकी २१ जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. त्यावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर शिवसेना मोठ्या हिरीरीने बिहार विधानसभा निवडणूक रिंगणात उतरली होती. पण शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या पराजयाचा सामना करावा लागला आहे. निलेश राणे यांनी काही मतदारसंघात शिवसेनेला मिळालेल्या मतांची आकडेवारी ट्वीट करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमधील मुस्लिमबहुल भागात काँग्रेस सपशेल अपयशी ठरल्याचं दिसतं तर त्या ठिकाणी भाजप उमेदवारांना चांगली मतं मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. हा महाराष्ट्र इफेक्ट आहे का? महाराष्ट्रात शिवसेनेसोबत गेल्यामुळे काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर आपली व्होट बँक गमवावी लागत आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.