मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर आहे, असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
काँग्रेस पक्ष एक प्रभावी विरोधी पक्ष राहिला नाही. राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला अध्यक्ष नाही. गेल्या दिड वर्षांपासून पक्ष अध्यक्षाविना काम करतोय. कार्यकर्त्यांची दिशा भरकटतेय, त्यांना माहीत नाही की, नेमकं कुठं जायचं आहे, असं कपिल सिब्बल म्हणालेत.
बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाला फारसं गांभीर्य नसल्याची खंतही कपिल सिब्बल यांनी बोलून दाखविली होती. पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर अद्याप आलेले नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असे पक्षनेतृत्त्वाला वाटत असावं, अशी टीका सिब्बल यांनी केली होती.