मुंबई (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केल आहे. ज्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारला महा पेंग्विन सरकार विषाणू म्हटलं आहे. यावरुन आता पुन्हा एकदा नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी समित ठक्कर नामक तरुणाला अटक केली आहे. यावरुन आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. शक्तीहीन (पॉवरलेस) मुख्यमंत्री असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्विट केलं होतं. हा त्याचा गुन्हा आहे का? असम म्हणत सवाल केला. यावर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांनी ‘पेंग्विन महा सरकार विषाणू’ म्हणत शिवसेनेवर निशाना साधला आहे.
“कोरोना आणि पेंग्विन महा सरकार हे दोन विषाणू निष्पाप लोकांवर कधीही, कुठे, कसे ग्रासतील हे सांगता येत नाही. क्वारंटाइन होण्यापासून आपला बचाव करा… त्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि नियमित मास्क वापरा. सुरक्षित राहा! गप्प बसा!” असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केला आहे.