साकळी ता यावल (किरण माळी) लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सव कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जाणार नाही आहे. तसेच कोणत्याही प्रकारे भाविकांना सुविधा या ठिकाणी निर्माण केल्या जाणार नाहीत. याच बरोबर गडावर येण्यासाठी प्रवेश बंदी असेल, अशी माहिती देवालय ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम साळुंके व विश्वस्तांनी दिली.
तालुक्यातील शिरागड येथील श्री सप्तश्रृंगी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव केवळ मंदिरातील धार्मिक पूजाविधी व घटस्थापना मोजक्याच लोकांच्या उपास्थितीत होणार आहे. यावर्षी भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जाणार नाही. कोविड १९ च्या प्रादुर्भावाने इतिहासात प्रथमच यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. अशी माहिती देवालय ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम साळुंके व विश्वस्तांनी दिली. तुळजापूरची तुळजा भवानी माता, माहूरची रेणुका माता, कोल्हारची भगवती माता व वणीची सप्तश्रृंगी माता असे साडेतीन शक्तीपीठ एकत्रित असून श्री सप्तश्रृंगी मातेचे असलेले एकमेव ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र शिरागड आहे.
तापी नदीच्या तीरावर वसलेल्या व श्री सप्तश्रृंगी मातेचे पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र शिरागड येथील नवरात्रोत्सवावर यावेळी कोविड महामारीचे संकट आले आहे. त्यामुळे आदिशक्तीच्या भक्तांविनाच यावेळचा नवरात्रत्सव साधेपणाने साजरा होणार आहे . नवरात्रोत्सवास १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर सध्या सर्वच मंदिराचे दरवाजे बंद आहेत. श्री सप्तश्रृंगी मतेच्या मंदिरातील नवरात्र काळातील रोजचे विधी, पूजा व घटस्थापना ठराविक लोकांमध्येच शासनाने घालून दिलेल्या नियम नुसार होणार आहे. सर्व धार्मिक विधी परंपरागत पद्धतीने केले जातील. नवरात्र काळात होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. केवळ मंदिर गाभाऱ्यातील नित्य पूजा, अर्चा होणार आहे.
मात्र यासाठी भाविकांना परवानगी दिली जाणार नाही . तसेच मंदिराचा सभामंडप सुद्धा बंद असणार आहे . त्यामुळे भागवतीमतेचे दुरूनच दर्शन घेता येईल. कुठल्याही भक्तास दर्शनासाठी परवानगी दिली जाणार नाही. नवरात्र काळात घटी बसणाऱ्या महिलांना यावेळी मंदिर सभामंडपात बसण्यास मज्जाव असेल. तसेच मंदिर परिसरात खेळणी, भेळीची दुकाने , फुलहार विक्रेते, पाळणे आदी दुकाने लावण्यास परवानगी नसेल. अनेक गावातून येणाऱ्या पायी ज्योती यांनाही मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याने कोणीही ज्योती घेऊन येऊ नये. संपूर्ण नवरात्र काळात मंदिर परिसरात कुणीही गर्दी करू नये तसेच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करू नये, असे आवाहन श्रीक्षेत्र श्री सप्तश्रृंगी मातेचे देवालय ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम सदू साळुंके यांच्यासह विश्वस्त तसेच शिरागड ग्रामपंचायत यांनी केले आहे.