धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील संजय नगर परिसरात किरकोळ वादातून तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत छायाबाई गणेश भिल (वय- 42 वर्ष धंदा, मजुरी रा. संजय नगर, जुनी पोलीस लाईन जवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 20 मे 2022 रोजी रात्री 09.30 वाजेच्या सुमारास गल्लीतील रेखाबाई दिलीप महाजन ही नैसर्गिक विधीसाठी जात असतांना ती शिवीगाळ करुन जात होती. यावेळी छायाबाई आणि आई जनाबाई यांनी कुणाला शिवीगाळ करताय विचारले. तेव्हा रेखाबाई म्हणाली की मी दुस-या बाईला शिवागाळ करते आहे. यावरून वाद वाढला. यानंतर रेखाबाई यांची दोन्ही मुले नामे आकाश दिलीप महाजन, सागर दिलीप महाजन अशांना शिवीगाळ केली. छायाबाई यांचा भाऊ मानसिंग जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच पाठीवर चाकूने वार केले. या संदर्भात अॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय अधिकारी करीत आहेत.