लातूर (वृत्तसंस्था) खासदार झाल्यापासून प्रशासनाकडून वाईट वागणूक मिळत असल्याचे जाहीर भाषणात खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विषय मांडण्याचं साकडं रामदास आठवले आणि देवेंद्र फडणवीस यांना घातलं आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातूरात 70 फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ नॉलेज पुतळ्याचे अनावरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 70 फूट उंचीच्या पुतळ्याचे काम सुरू असताना मनपाच्या आयुक्तांनी मला वरून दबाव आहे, पुतळ्याचे काम थांबवा म्हणून खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पीएला फोन करून सांगण्यात आले. तर शासकीय कार्यक्रम पत्रिकेत खासदार याचं नाव टाकलं पाहिजे असा प्रोटोकॉल असताना कार्यक्रम पत्रिकेत नाव टाकलं जात नाही. योजना या केंद्र सरकारच्या असताना मी दिल्लीला गेलो की, उदघाटन करून घेतात अशी अपमानास्पद वागणूक मिळत आहे. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयी बोलावं अशी मागणी जाहीर सभेत लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाला विरोध करणारी ही कसली महानगरपालिका? खरं तर महानगपालिकेने विरोध करायला नको होता अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना मी संविधानाचं रक्षण करण्यासाठी दिल्लीत आहे. खासदाराला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून टाकू असा दम मंत्री रामदास आठवले यांनी भरला. खासदार असेल मंत्री असेल तो कोणत्याही पक्षाचा असो प्रोटोकॉल पाळला पाहिजे अंस आठवले म्हणाले.