कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) सध्या सर्वीकडे कोरोनाने थैमान घातले असून यावर सरकार प्रशासनाने वेगवेगळे निर्बंध लावून दिले आहे. याच कोरोनामुळे एक वयोवृद्ध महिला शांताबाई बाविस्कर असून या महिलेचे काल संध्याकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. यासाठी कोणीही महिलेच्या अंतविधीस पुढे आले नाही. यावेळी मुस्लिम समाज बांधवानी पुढाकार घेऊन महिलेचा अंत्यसंस्कार केला.
यात कासोदा ग्रामपंचायत सदस्य पुत्र अशपाक अली यांनी व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य अर्शद अली, मुखतार अली, सद्दाम पिंजारी, मुश्रीफ पठाण, अमजद खान, जाकीर अली, रियाज शेख, नफीस शेख, जमील पिंजारी, तजमुलशेख, मुरसलीन शेख, तोसीफ शेख, आदि मुस्लिम समाज बांधवांनी पुढाकार घेऊन महिलेचा अंत्यसंस्कार केला. या पवित्र रमजान महिन्यात या सर्वांनी पुढाकार घेत कोरोना सारख्या साथरोग संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर हा पुढाकार घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.