मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देशात चार दिवस लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पण लस उत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची गरज आहे. आम्ही टीका उत्सव करु. पण आधी लस द्या. जर ही लस नसेल तर लस उत्सवाची वेळ बदला, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन ते तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे. पात्र लाभार्थ्यांचे अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र ही लसीअभावी बंद करावी लागली आहेत. तर काही ठिकाणी कोरोना लस तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील लस देणं बंद करण्यात आलं आहे. राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढ्याच लसी आहेत. त्यावरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. लस वाटप नियंत्रण केंद्राच्या हातात आहे. मात्र केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश दिसत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देशात चार दिवस लसीकरण महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. लस महोत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची गरज आहे. आम्ही महोत्वस करू. पण आधी तर लस द्या. लस पुरवठा करणे शक्य नसेल, तर लस महोत्सवाची वेळ बदला, असे जयंत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्राची कोरोना लसींची मागणी सुमारे ४० ते ५० लाख होती. मात्र, केंद्राकडून फक्त साडे सतरा लाख लसी आल्या. या लसी लगेच संपतील, असेही ते म्हणाले.
ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला, तिथे जास्त लस दिली पाहिजे. महाराष्ट्राची मागणी ४० ते ५० लाख इतकी होती. मात्र केंद्राकडून फक्त साडे सतरा लाख लस मिळाल्या. या लसी लवकर संपतील. आजही बीकेसीच्या कोरोना लसीकरण केंद्रात लस नाही. तिथे लोकं लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. पण लस उपलब्ध नसेल तर कसं होणार, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
लस वाटप नियंत्रण हे केंद्राच्या हातात आहे. केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश दिसत आहे. पंतप्रधान मोदी जे सांगितली ते देश करायला तयार आहे. त्यांनी थाळी वाजवायला सांगितली, आम्ही ते केलं. त्यावर टीका केली नाही. पण आता देशात कोरोना लसीचा फक्त पुरवठा झाला पाहिजे. आता आम्ही टीका उत्सवही करु. पण त्यासाठी लस द्या. ती नसेल तर लस उत्सव वेळ बदला, असेही ते म्हणाले.