जळगाव प्रतिनिधी । कोविड सेंटरमध्ये महिलांकरीता स्वतंत्र वार्ड निर्मित करून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी भाजपा महिला आघाडी जळगाव जिल्हा महानगरतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महिलांच्या स्वतंत्र वार्डात महिला स्टाफ व सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात यावी, त्याचबरोबर सीसीटीव्ही बसविण्यात यावे,अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना महापौर भारती सोनवणे, स्मिता वाघ, महिला आघाडीच्या अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, रेखा वर्मा आदी उपस्थित होते.