धरणगाव (प्रतिनिधी) उड्डाणपूलाजवळील जळगाव एंरडोल रोड प्रवेश द्वार चौफुलीला राजमाता जिजाऊ चौक नाव देण्यात यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना करण्यात आली आहे.
धरणगाव उड्डाणपूल जवळील जळगाव एंरडोल रोड प्रवेशद्वार जवळील चौकाला राजमाता जिजाऊ चौक असे नामकरण करण्यात यावे, यासाठी सकल मराठा समाजाकडुन नगराध्यक्ष निलेश चौधरी व मुख्यधिकारी पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. निवेदन देतांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, नगरसेवक किरण मराठे, चंदन पाटील, वाल्मिक पाटील, गुलाब मराठे, गोपाल पाटील, नंदु पाटील, वैभव पाटील, रवि पाटील, शंकर शिंदे, राहुल पवार व समाज बांधव उपस्थित होते.