मुंबई (वृत्तसंस्था) ‘आम्ही कधीही कुणाच्या घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कधीही टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय बोलता, काय टीका करता, काय टीव्ट करता, हे सर्वांनी पाहिले आहे. पण मी कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर हे उत्तरानेच देईल’ असा इशारा फडणवीस यांनी दिला.
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत्ता फडणवीस या ना त्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर टीका करत असतात. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या बाजूने मैदानात उतरले असून टीका करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. तसंच अमृता फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या सेनेच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खडेबोल सुनावले आहे. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘जर आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांनाही कुटुंब आहेत’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर फडणवीस यांनी अत्यंत शांतपणे दिलं. मी राजकारणात आहे आणि मी उत्तराला उत्तर देईल अशी भूमिका फडणवीसांनी स्पष्ट केली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाऊबीजच्या दिवशी ‘तिला जगू द्या’ हे गाणं प्रदर्शित केलं. ‘तिला जगू द्या’ या गाण्याची निर्मिती टी सिरीजने केली आहे. यावेळी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. एवढचं नाही तर अनेक मुद्द्यावरून काही राजकीय लोकांनी त्यांच्यावर टीका केली. यावर फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
















