चोपडा (प्रतिनिधी) येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा शहर व चोपडा तालुका शाखा यांच्या वतीने दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता अशोका विजया दशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिवस चोपडा शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी अशोका बुद्धविहार येथे पंचशिल ध्वजारोहण हितेंद्र बिरबल मोरे यांच्या हस्ते करण्यांत आले. येथून शांती रॅलीचे आयोजन करण्यांत आले त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ व तालुकाध्यक्ष बापूराव गिरधर वाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायीक वंदना घेण्यांत आली. समता सैनिक दल यांनी सलामी दिली.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळास समता सैनिक दल प्रमुख शालीग्राम व्यंकट करंदीकर व जानकीराम शंकर सपकाळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यांत आला व सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आधार छगन पानपाटील यांनी केले. सुत्रसंचलन देवानंद यशवंत वाघ यांनी केले.सदर कार्यक्रमास सर्व समाज बांधव,बौद्ध उपासक, उपासिका,पदाधिकारी,कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.