कोल्हापूर (वृत्तसंस्था) राज्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधीच आता राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, या निवडणुकांच्या तोंडावर करुणा शर्मा-मुंडे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा करताच धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला आहे. ‘धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या. त्यांना पुढे निवडणुकांमध्ये मोठ्या अडचणी येणार आहे’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.
करूणा मुंडे म्हणाल्या माझ्याकड़े लपवण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे मी निवडणूक शपथपत्रात सगळी खरी माहिती भरणार आहे. तसेच माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत. त्यामुळे अर्ज भरताना मला कोणतीही अडचण येणार नाही, असे करूणा मुंडे यांनी सांगितले.
पुढे बोलताना करूणा मुंडे म्हणाल्या की, मला जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा आहे. महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणासह कोल्हापुर मधील घराणेशाही संपवण्यासाठी माझा लढा आहे, असे करूणा मुंडे यांनी सांगितले. याबरोबरच करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रेमकहाणी चित्रपटाच्या माध्यमातून समोर येईल, असे करुणा मुंडे यांनी सांगितले.