धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील नाईट ग्रुपतर्फे १३ एप्रिलच्या रात्री बारा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला माल्यार्पण करत मानवंदना देण्यात आली.
नाईट ग्रुपतर्फे बाजार पेठ येथून कोट बाजार,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुष्पहार अर्पण केले. वाजत गाजत जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मारकपर्यंत सर्व नाईट ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून मानवंदना दिली. या वेळी नाईट ग्रुपचे दिपकभाऊ वाघमारे, समीर भाटिया, राजू ओस्तवाल, डॉ. धिरज बाजपई, सिताराम मराठे, अजय महाजन, किरण अग्निहोत्री, विनोद रोकडे, ऐनोद्दिन जनाब, निजामोद्दिन जनाब, जयेश महाजन, सागर बाजपाई, गिरीश महाजन, मुन्ना जगताप,मनिष चौधरी, कालु बागवान आदी असंख्य सदस्य उपस्थित होते.