धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दहावीत प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यास पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते दरवर्षी एक दुचाकी दिली जाते. त्यानुसार यंदा इंदिरा गांधी विद्यालयातील कुमारी चेतना पुरुषोत्तम कोतकर या विद्यार्थिनीला ९८ टक्के गुण मिळाले. ती तालुक्यातून पहिली आल्यामुळे मंगळवारी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते तिला दुचाकी देण्यात आली.
गुणवंतांच्या पंखांना बळ देण्याचं मोठं दातृत्व पालकमंत्र्यांनी दाखवून दिल. इंदिरा गांधी विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. दुचाकी मिळवलेल्या मुलीचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी संस्थाध्यक्ष डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील, तहसीलदार, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, विलास महाजन पप्पू भावे विजय महाजन बुटा पाटील संजय चौधरी विनायक महाजन धीरेंद्र पूर्वे, वाणी समाजाचे अध्यक्ष विलास वाणी, ललित येवले उपस्थित होते.