झारखंड (वृत्तसंस्था) फिरायला नेण्याच्या बहाण्याने आपल्याला वहिनीवरच बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना झारखंडमधील रांची येथे घडली. याबाबात पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली आहे.
बाहेर फिरायला नेण्याच्या बहाणा करून पीडित महिलेला तिच्या दिराने पाटणा आणि दिल्लीला घेऊन गेला. दिल्लीत त्याने एका भाड्याच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्या महिलेला कोलकात्याताला घेवून गेला. झालेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने रांची रेल्वे स्थानकावर तिला सोडून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीडित महिलेने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशियताचे महिलेच्या घरी ये-जा होती. २८ मार्च रोजी संशियताने ३ वाजता भेटायला बोलावले. त्याने टॅक्सी बुक केली आणि फिरायला जाऊया असे सांगून घेवून गेला. पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत फिरायला गेली. मात्र, काही अंतर कापल्यावर गाडीतून उतरवून बसमध्ये बसवले आणि नंतर पाटण्याला घेऊन गेला. पाटण्याहून ट्रेनने दिल्लीला आणले. येथे त्याने भाड्याचे घर घेतले. त्याठिकाणी त्याने २ दिवस तिच्यावर बलात्कार केला.
२ दिवस कोलकाता हॉटेलमध्ये डांबून तिच्यावर बलात्कार केला. तिने घरी जाण्यावर अडून बसल्यावर ४ एप्रिलला तिला ट्रेनने रांचीला नेले. रांची स्टेशनवर पोहचताच त्याने संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर त्याने पीडितेला रांची रेल्वे स्टेशनवर सोडून पळ काढला. पीडित महिला घरी पोहोचताच तिने पतीला घटनेची संपूर्ण माहिती दिली. यानंतर पोलिसात तक्रार तिने दाखल केली.