साकळी (प्रतिनीधी ) तालुक्यातील मनवेल येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत येथील तलाठी कार्यलयातुन गरजु लाभार्थ्यांना घरपोच उत्पनांचे ३५ दाखले वाटप करण्यात आले.
मनवेल येथील तलाठी स्वप्निल तायडे यांनी महाराजस्व अभियान अंतर्गत गरजुना उत्पनांचे दाखले वाटप करण्याचा उपक्रमाला नागरीकांकडुन चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी ग्रामसेवक हेमंत जोशी पो.पा.विठ्ठल कोळी, गणेश पाटील, पत्रकार गोकुळ तायडे, राजेद्र पाटील, डिगंबर पाटील आदी उपस्थित होते.