धरणगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त जळगाव जिल्हा संयोजक इच्छेश काबरा यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून युवकांसमोर एक नवीन आदर्श उभा केला.
रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. आपले रक्त देऊन आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो. आपणही समाजाचा देणं लागतो, याच सामाजिक भावनेतून ते दर ४ महिन्यानंतर रक्तदान करतात. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना दिनानिमित्त माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त पेढीत जाऊन त्यांनी रक्तदान केले.