TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरणा धरणातून जिल्हावासियांना मिळणार तीन आवर्तने !

पाणी आरक्षण व कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) यंदा पूर्ण भरलेल्या गिरणा धरणातून जिल्ह्यासाठी तीन आवर्तने सोडण्यात येणार असल्याचा निर्णय आज पाणी आरक्षण आणि कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नियमानुसार गिरणा धरणातून दोनच आवर्तने मिळणार असतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकरी आणि लाभक्षेत्राच्या परिसरातील जनतेचे हित लक्षात घेता तिसरे अतिरिक्त आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने गिरणा धरणातून अनुक्रमे १५ डिसेंबर, १५ जानेवारी आणि १ मार्च रोजी तीन आवर्तने सुटणार आहेत. तर पाटचार्‍यांच्या दुरूस्तीसाठी पाटबंधारे विकास खात्याने तयार केलेल्या १२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. यामुळे गिरणातील पाण्याचा शेवटच्या शेतकर्‍यालाही लाभ मिळणार आहे.

READ ALSO

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

या संदर्भात वृत्त असे की, जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती आणि कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अधिक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधीकरण एस.डी. दळवी, पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता वाय. के. भदाणे, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. अग्रवाल, कालवा सल्लागार समिती सदस्य लताबाई धनगर व दत्तू जगन्नाथ ठाकूर; निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, महसूलचे नायब तहसीलदार अमित भोईटे, पाटबंधारे विभागाचे डी. बी. बेहेरे, मध्यम प्रकल्पाच्या अदिती कुलकर्णी, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, मजिप्रा अधिक्षक अभियंता एस. सी. निकम आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. एस.भोगवडे यांची उपस्थिती होती.

जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून यावर १३८ गावे अवलंबून आहेत. तर, बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी, अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा आणि गुळ या मध्यम प्रकल्पांवर १०१ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो. अर्थात, तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो. या सर्व प्रकल्पांमधील पाणी आरक्षणाला या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली.

गिरणा धरण १९६९ साली पूर्ण झाले असून गत ५२ वर्षात ते १२ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे धरण लागोपाठ १०० टक्के क्षमतेने भरले आहे. यंदा देखील धरण पूर्ण भरल्याने यातील पाण्याचा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव, धरणगाव व अमळनेर तालुक्यातील २२२८१ हेक्टर जमीनीला सिंचनासाठी लाभ होणार आहे. याच तालुक्यांमधील १६० गावांना पिण्याच्या पाण्यासाठीही याचा लाभ होणार आहे. या अनुषंगाने गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्यात यावीत असे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. यातील शेती सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पहिले आवर्तन धरणातून १५ डिसेंबर रोजी सुटणार असून यातून ११०.२९ दशलक्ष घन मीटर इतके पाणी सोडण्यात येणार आहे. १५ जानेवारी २०२२ रोजी १०६.०४ दशलक्ष घन मीटर इतक्या पाण्याचे दुसरे आवर्तन सुटणार आहे. तर पालकमंत्र्यांनी खास शेतकर्‍यांना लाभ व्हावा म्हणून १ मार्च २०२२ रोजी १०६.०४ दशलक्ष घन मीटर इतक्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रातील अनेक पाटचार्‍या नादुरूस्त झाल्या असून यामुळे आवर्तनाच्या पाण्याचा शेतकर्‍यांना पुरेपूर लाभ होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अधिक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधीकरण श्री. दळवी यांना त्यांच्या खात्याने पाटचार्‍यांच्या दुरूस्तीसाठी तयार केलेल्या १२ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे निर्देश दिले. यामुळे गिरणा धरणातील पाणी हे शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत पोहचणार आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नितीश कुमारच मुख्यमंत्री, आम्ही दिलेला शब्द पाळतो – फडणवीस

November 11, 2020

पाचोरा : दहा हजारांची लाच घेणाऱ्या संरपंचासह पंटरला अटक !

September 28, 2024

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळे यांनी सुनावले खडेबोल !

January 30, 2023

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता प्रवेशासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group