जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सन २०२० पासून सुरू झालेला कोरोना कोठेतरी संपेल असे वाटत होते. परंतु कोरोनाने २०२१ मध्ये फार मोठी उसळी घेतली आहे. जिल्ह्यातील एक मोठी संस्था ४० ते ५० ऑक्सिजन लेव्हल असणाऱ्यांवर उपचार करीत आहे. त्या संस्थेतील डॉक्टर, कंपाउंडर स्वतःच्या जीवावर बेतून काम करीत असल्याची भावना नगरसेवक पिंटू कोठारी यांनी व्यक्त केली आहे.
मागील वर्षी कोरोनाचे काम बघत घेते असतांना अंतिम संस्कारासाठी तीन – चार बॉड्या रोजच्या रोजच्या राहायच्या. गेल्या एप्रिल महिन्यात रोजच्या ९ -१० बॉड्या येत आहे. डॉक्टरांना माहिती असते की, आता रुग्ण वाचणार नाही. त्यावेळी जेवढा मलिदा खायचा आहे तो खाऊन रुग्णाला सिव्हिल किंवा गोदावरी हॉस्पिटलमध्ये रेफर करून देण्याचा प्रकार चाललेला आहे. गोदावरी हॉस्पिटला दोष देऊन काही फायदा नाही. एक मोठी संस्था जी ४० ते ५० ऑक्सिजन लेव्हल असणाऱ्यांवर उपचार करीत आहे. त्या संस्थेतील डॉक्टर, कंपाउंडर स्वतःच्या जीवावर बेतून काम करीत आहे. त्याठिकाणच्या मृत्यू दर का जास्त राहणार याचे कारण आहे. जिल्ह्यातून कोणताही हॉस्पिटल असे खाजगीे कोविड सेंटर असो त्यांना रेफर बाय सिव्हिल किंवा गोदावरी हॉस्पिटल रेफर केले जात आहे. शेवटी ४० ते ५० ऑक्सिजन लेव्हलवर आल्यानंतर मृत्यू दर वाढत आहे. गोदावरी हॉस्पिटल मधील सर्व मृतदेह तसेच भुसावळ तालुक्यातील मृतदेह तापी नदीवर आणले जात आहे.
गेल्या महिन्याभरात प्रमाण वाढलेले आहे. परंतु ही परिस्थिती पाहता ज्यांच्या घरी निधन होत आहे. त्यांच्या डोक्यावरती फार मोठा दुःखाचा डोंगर आहे. त्याला कुठेतरी सावरण्याचे काम नगरपालिकेचे पवार, राठोड, अरुण हे गेल्या दीड वर्षापासून करीत आहे. टाळी नदीवर ओटे कमी पडत असल्याने तापी नदीच्या पात्रात मृतदेह जाळला जात आहे. सिंधी कॉलनी स्मशान भूमीमध्ये कोरोना मृतदेह पाठविला जात आहे. परिस्थिती बिकट होत चाललेली आहे.
नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. शासन प्रशासन लॉकडाउन करून हा पर्याय थांबणार नाही. स्वतःची काळजी न घेतल्यास वेळेवर उपचार न केल्यास ज्यावेळी ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास चेक करा, औषधी घ्या, इलाज करा, मदत करा, परिस्थिती बिकट आहे, यावर मात करण्यासाठी माणसाने माणसाला मदत केली पाहिजे, हा खरा विषय आहे, त्याशिवाय कोरोन संपणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नगरसेवक पिंटू कोठारी यांनी मांडली आहे.