मुंबई (वृत्तसंस्था) बाहेरून आलेल्या अमरावतीच्या लोकांनी शिवसेनेसोबत पंगा घेऊन नये, अन्यथा महाराष्ट्रात राहणे मुश्किल करू’, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला.
‘जे लोक मुंबईला हनुमान चालिस वाचायला गेले. ते आम्हाला हिंदुत्व शिकवतात, हा सर्वात मोठा विनोद आहे. बाहेरून आलेल्या अमरावतीच्या लोकांनी शिवसेनेसोबत पंगा घेऊन नये, अन्यथा महाराष्ट्रात राहणे मुश्किल करू’, असं राऊत म्हणाले. जेव्हा शिवसैनिक अयोध्येत शाहिद होत होते, तेव्हा हनुमान चालीसावाले कुठे गेले होते? चीनच्या सीमेवर चिनी सैनिक आले तेथे हनुमान चालीसा जाऊन म्हणावी. जेव्हा पर्यंत आमचे मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी नागपूरला येत राहील. संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुंबईत मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणणार असल्याचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्यावर कोरडे ओढले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर आता भाजपकडूनही मविआ सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान खासदार नवनीत राणा यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून राणा दाम्पत्याने यासंदर्भात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.