औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादेत महाराणा प्रतापांच्या पुतळ्यावर एक कोटी खर्च करण्याऐवजी राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करावी, पण फक्त पुतळा उभारायचे असेल तर माझा ठाम विरोध आहे, असं औरंगाबादचे (Aurangabad) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी स्पष्ट केलं आहे. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध केला आहे.
जलील यांच्या भूमिकेला शिवसेनेचा विरोध केला आहे. आमदार अंबादास दानवे यांनी जलील यांच्या मताला विरोध केला आहे. ‘महाराणा प्रताप हे थोर, महान शूरवीर होते. त्यांच्याबद्दल कुणीही प्रश्न उपस्थितीत करू शकत नाही. पण मी एक सल्ला दिला की महाराणा प्रताप यांच्या नावाने एक सैनिकी शाळा सुरू करूया. या शाळेचं नाव महाराणा प्रताप ठेवावे. ग्रामीण भागातील इच्छूक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे. त्यांना याचा लाभ होईल. त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरेल’ असा सल्ला दिला असल्याचं जलील यांनी सांगितलं.
तसंच, ‘मी पुतळ्याला विरोध करत नाही. पुतळा बनवायचा असेल तर आपण वर्गणी गोळा करू, मी सुद्धा वर्गणी देण्यासाठी तयार आहे. पण एक कोटी रुपयांमध्ये ग्रामीण भागात एक चांगली शाळा उभारू शकतो. त्याचा अनेक लोकांना फायदा होईल. पण मी म्हटल्यावर काहींना काही राजकारण आणायचे, भाजप आणि शिवसेनेला आपण खूप मोठे हिंदुत्वावादी आहोत हे दाखवताय. मी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करत नाही आणि करणारही नाही. पण भाजप-सेनेचे लोक राजकारण मध्ये आणत आहे’ अशी टीका जलील यांनी सेना आणि भाजपवर केली.
‘कोणत्या पुतळ्याला बघून तुम्ही कोणती प्रेरणा घेतली, कमीत कमी शाळेमध्ये गेला असता तर काही शिकवण घेतली असती तर काही तरी ज्ञान मिळाले असते. फक्त पुतळे उभारायचे असेल तर त्याला माझा विरोध आहे तो कायम राहिल, असंही जलील यांनी ठामपणे सांगितलं.