जळगाव (प्रतिनिधी) आयुध निर्माण तथा संरक्षण विभागाचे अधिकारी डॉ. देवानंद उबाळे यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्लीच्या संचालकपदी नियुक्ती झाली असून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहे.
केंद्रीय सरकारच्या संरक्षण विभागातील तसेच आयुध निर्माण (ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव)मधील भूतपुर्व अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ठ सेवा बजावली आहे. डॉ. श्री. उबाळे हे प्रतिभावंत लेखक, आंबेडकरी विचावंत आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय आयोगात महत्वाच्या पदावर त्यांना कान करण्याची या निमित्ताने संधी मिळाली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वच स्तरातून विशेषत: मागास वर्गातून अभिनंदन होत आहे.