जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद येथे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ च्यावतीने डॉ.डी.एम. देवांग उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ नाशिक विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
सदर अभिवादनप्रसंगी जिल्हाध्यक्ष महासंघ सुनील सोनवणे, अध्यक्ष जि.प.संघटना आर. टी.सोनवणे, जिल्हा सचिव आरोग्य मिलिंद लोणारी, जिल्हा कार्यध्यक्ष महासंघ रविकिरण बिहाडे, सुनिलआबा सूर्यवंशी, सहाय्यक प्रशासन अधिकारी जि प जळगाव, सतिष चौधरी गट शिक्षणाधिकारी पं.स.जळगाव, एजाज शेख शिक्षण विस्तार अधिकारी, फिरोज पठाण शिक्षण विस्तार अधिकारी, खलील शेख शिक्षण विस्तार अधिकारी, कैलास तायडे, बापू वाघ, किशोर वानखेडे, शकील देशपांडे, सलीम तडवी, जितेंद्र सोनवणे, नाना सोनार, कांतीलाल पाटील, अंबरनाथ सपकाळे, आर.एस.कांबळे, भूषण तायडे, बी. टी. सुर्यवंशी, अजय पाटील, प्रमोद काळे, शिवाजी सपकाळे, विशाल घोरपडे, मोहन टेमकर, अनिल चौधरी, जी ये जमादार, रागिणीताई चव्हाण, बैसाणे, दिपाली पाटील, रत्ना बागुल, संगिता सपकाळे मोठ्या संख्येने कर्मचारी बंधुभगीनी उपस्थित होत्या.