धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नवनिर्मित डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत येथे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पूजन करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. हेडगेवार ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संघ परिवाराचे बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी समाधान मोरे, चंदन पाटील, संजय पवार, वैभव बोरसे, अनिल देशमाने, सुनील वाणी, पिंटू पवार, वैभव पाटील, दीपक शिरसाळ, हरीश विसावे, अविनाश बाविस्कर, सागर पाटील, निखिल पाटील, ऋषभ पाटील, निनाद कापुरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













