जळगाव (प्रतिनिधी) पण महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे व उपाध्यक्ष रोहित निकम यांनी दिलेल्या निवेदनामुळे नाफेड कार्यालयाकडून 2022-23 मधील रब्बी हंगामातील हरभरा खरेदीची थकबाकी पण महासंघाला देण्यात आली आहे. एकूण 11 कोटींची थकबाकी पण महासंघाला देण्यात आली आहे.
राज्य शासनामार्फत किंवा नाफेड मार्फत भरडधान्य खरेदी केली जाते. याची बरीचशी थकबाकी अडकलेली होती. त्यासाठी पणन महासंघाच्या प्रलंबित थकबाकी संदर्भात दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांना परम महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे व उपाध्यक्ष रोहित निकम यांनी थकबाकी त्वरित अदा करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यावेळी एनसीसीएफचे अध्यक्ष विशाल सिंह, नाफेडचे महाराष्ट्राचे संचालक केदा आहेर, पणन महासंघाचे सरव्यवस्थापक नितीन यादव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दिलेल्या निवेदनामुळे नाफेड कार्यालयाकडून त्वरित कारवाई करण्यात आली आणि दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी 2022- 23 मधील रब्बी हंगामातील हरभरा खरेदीची एकूण 11 कोटी रुपयांची थकबाकी पणन महासंघाला देण्यात आली आहे. थकबाकी मिळाल्याने अध्यक्ष उपाध्यक्षांचे सर्वांनी आभार मानले.