मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाही असे स्पष्ट केलं आहे.
तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला. अमित शाह आणि माझं जे ठरलं होत ते झालं असते तर महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. सगळं सन्मानानं झाले असते. पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा किंवा भाजपचा झाला असता असेही ठाकरे यावेळी म्हणाले. जे भाजपसोबत आज गेले, त्यांनी भाजपला प्रश्न विचारायला हवा असेही ते म्हणाले. कालच मी नव्या सरकारच अभिनंदन केलं. अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. अडीच वर्षापूर्वी मी अमित शहा यांना अडीच वर्षाचा फॉर्मुला सांगितला होता. पण त्यावेळा त्यांना ते पटलं नाही. अडीच वर्षापूर्वी जे ठरल होत आता तेच झाल. मग त्यावेळी त्यांनी का ऐकलं नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
















