जळगाव (प्रतिनिधी) येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये काही अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना टेस्ट झाल्याचे कळविले नाही. तसेच त्यांच्या या आडमुठेपणामुळे इतर लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यापीठमध्ये तात्काळ येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची मुख्य प्रवेशद्वारावर कोरोनाची चाचणी करून विद्यापीठात प्रवेश देण्यासंबंधीचे आदेश तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सचिव अँड. कुणाल पवार यांनी जिलाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मागील बऱ्याच काळापासून आम्ही विद्यापीठमध्ये भोंगळ कारभार विषयी आवाजउठवत असून तिथल्या पिळवणूक विषयी वारंवार समस्या मांडत आहोत परंतु तिथल्या काही विशिष्ट मंडळी ह्या व्यक्ती गत स्वार्थासाठी सर्वाना वेठीस धरत आहेत. तसच एक प्रकरण हे आहे आम्ही दैनिकच्या माध्यमातून जाहीर पणे संगितले होते. त्यात स्पष्टपणे नमूद केले होते की, काही अधिकारी कोरोना पॅसिटीव्ह असल्यावर देखील विद्यापीठमध्ये काही लोकांची बिले काढण्यासाठी त्यांच्या दालनात आले व अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या वावरल्या वर घरी बसले नाही, तसेच त्यांची टेस्ट झाल्याचे इतरांना कळवले नाही. त्यांच्या अश्या आडमुठेपणा मुळे इतर लोकांचा जीव धोक्यात घातलेला आहे. त्यांच्या वर देखील शासन नियमांच्या आधींन राहून कारवाई करावी व विद्यापीठमध्ये तत्काळ येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीची मुख्य प्रवेश द्वार वर टेस्ट करून त्याना विद्यापीठात प्रवेश द्यावा. असे आदेश तत्काळ देण्यात यावे, जेणे करून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही व परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, असे अँड. कुणाल पवार यांनी आपल्या मागणीत म्हंटले आहे.