जळगाव (प्रतिनिधी) संकटग्रस्त व पिडीत महिलांसाठी जिल्ह्यात एकाच छताखाली आरोग्य विषयक, कायदे विषयक, मानसशास्त्रीय, समुपदेशन, तात्पुरता निवारा, हेल्पलाईन नंबर इ. व यासारख्या सर्व सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने वन स्टॉप सेंटर ही केंद्र पुरस्कृत योजना सुरु आहे.
जळगाव जिल्ह्यात हे सेंटर कायमस्वरुपी जागेत सुरु होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात शासकीय आशादिप महिला वस्तीगृह, प्लॉट नं.६, विजय कॉलनी, गणेश कॉलनी जवळ, अशोक बेकरी समोर, जळगाव, दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५१९७४ व महिला हेल्पलाईन क्रमांक १८१ वर सुरु करण्यात आले आहे. संकटग्रस्त पिडीत महिलांना या सेवेचा विनामुल्य लाभ मिळण्याकरीता या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
















